अभाविपचा विद्यापीठावर धडकला मोर्चा

Foto
शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा संदर्भातील अनिश्चितता , वाढते शैक्षणिक शुल्क , नवीन प्रवेशासंबंधी अडचणी अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. मागील काही महिन्यांपासून अर्थचक्र पूर्णतः विस्कळीत झाले आहे. याचा जास्त परिणाम मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे नवीन वर्ष 2020-21 साठी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क 30 टक्के कमी करा. यासह आदी शैक्षणिक मागण्यांसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यापीठ परिसरात मोर्चा काढण्यात आला. 
शैक्षणिक मागण्या घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मोर्चा काढून विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना दहा टक्के शुल्क घेऊन प्रवेश द्यावा. तसेच उरलेले शुल्क भरण्यासाठी चार टप्प्याची मुभा देण्यात यावी, तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे. याशिवाय एटीकेटी विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालासंबंधी राज्य शासनाची भूमिका तत्काळ स्पष्ट करावी, विद्यापीठ व विद्यापीठ उपपरिसरात तात्काळ विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरू करावे. यासह आदी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी परीक्षा झाल्याच नाहीत तर परीक्षा शुल्क का भरावे? कॉलेज बंद आहेत तर पूर्ण शैक्षणिक शुल्क का भरावे ? नवीन शैक्षणिक वर्ष अजून सुरूच नाही. तरीही विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क का घेतल्या जात आहे? असे विविध प्रश्न यावेळी मोर्चा काढून मांडण्यात आले. यावेळी अभाविपचे स्वप्नील बेगडे, गोविंद देशपांडे, तुषार साळुंके, अक्षय शिंदे, मंगेश ढगे, उमाकांत पांचाळ, गोरखनाथ केंद्रे, अभय लांडे, आरती कुलकर्णी, स्नेहा पारीख, अंकिता पवार, भक्ती जोशी सह आदींनी सहभाग नोंदविला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker